बच्चू कडू यांच्या प्रहार इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये हिंगोली येथील Adv. माने यांच्या शॉर्ट फ़िल्मला पुरस्कार
प्रतिनिधी - पुणे येथे अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वतीने राज्यस्तरीय कलाकार मेळावा 2019 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येरवडा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रहार इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2018 मध्ये निवड झालेल्या चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये हिंगोली येथील Adv. चारुशील माने यांचा दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स या लघु चित्रपटास देखील पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराच्या स्वरूपात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सदरचा पुरस्कार आगामी "फॉर सेल" या लघु चित्रपटातील कलाकार राणी माने यांनी सदरचा पुरस्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्विकारले. सदरचा पुरस्कार हा मराठी चित्रपट अभिनेत्री सायली शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे बाळासाहेब काकडे हे तसेच प्रहार चित्रपट संघटनेचे दगडू माने तसेच महोत्सव दिग्दर्शक संदीप मोहिते हे व इतर प्रमुख कलाकार सोनू तुला
माझ्यावर भरोसा नाही काय चे फेम मारुती चव्हाण व विशेष अतिथी हजर होते. सदरच्या कार्यक्रमास या लघु चित्रपटाची यापूर्वी नाशिक येथे दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार मिळाला होता. तसेच पुणे येथील तिसऱ्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये 1111 फिल्ममध्ये बेस्ट रायटर चे नामांकन मिळाले होते. Adv. माने यांच्या मळण या लघू चित्रपटास देखील तीन पुरस्कार मिळाले आहेत.
यानंतरचा आगामी लघुचित्रपट "फॉर सेल" हा या आठवड्यात प्रेक्षकांना सोशल मीडियावर पहायला मिळणार आहे. Adv. माने यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.