अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर बेस्ट फिल्म हा पुरस्कार

अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर बेस्ट फिल्म हा पुरस्कार

NEXGN INTERNATIONAL SHORT FILM FESTIVAL, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथून मळण या चित्रपटास अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर बेस्ट फिल्म हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे व सदरचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 14, 15 व 16 डिसेंबर या महोत्सवात शेवटच्या दिवशी दिला जाणार आहे. NEXGN (Creative Studio) ही इंटरनॅशनल ऍक्रिडिटेशन फोरम अँड एमरेट्स इंटरनॅशनल ऍक्रिडिटेशन द्वारे प्रमाणित केलेल्या संस्थेचे फाउंडर सुरज साळुंखे तसेच डायरेक्टर रविना सिंग हे आहेत. तसेच नेक्सजन क्रिएटिव्ह स्टुडिओ हि वेब डिझाईनिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, लोगो डिझाईनिंग, इव्हेंटस सेट अप्स, सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँड प्रमोशन साठी प्रसिद्ध असलेली ही अत्याधुनिक सोयी द्वारे स्थापित संस्था इचलकरंजी येथे आहे. त्यांच्या वतीने आयोजित या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात "मळण" फिल्म साठी ट्रॉफी व आंतरराष्ट्रीय मूल्याचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. अजून पुढील तपशील हाती लागल्यास पुढील अपडेट देण्यात येईल, असे मळण लघु चित्रपटाचे निर्माते, लेखक व दिग्दर्शक ऍड . चारुशील माने यांनी कळविले आहे. यापूर्वी मळण लघुचित्रपटास रहिकवार ब्रदर्स आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्डस 2019 बल्लारपूरमध्ये मळण साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला होता व कला-समृद्धी फिल्म फेस्टिवल मुंबई येथे नॅशनल शॉर्ट फिल्म चे नामांकन मिळाले होते, तसेच पहिले वैदर्भीय आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव वर्धा जिल्ह्यात पार्टीसिपेशन अवॉर्ड मिळाला होता. याशिवाय ११वे दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड मुंबई मध्ये "मळण" ला बेस्ट शॉर्ट फिल्म नामांकन मिळाले आहे, व पुरस्कार यादी अजून येणे बाकी आहे आणि नेक्सजन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये ऑफिशियल सिलेक्शन झाले आणि प्रदर्शन येत्या 14, 15 व 16 रोजी ठरलेल्या वेळेत होणार आहे. एवढेच नव्हे तर इचलकरंजी येथील विनोद आवळे यांच्या देखील वेगळ्या आयोजित इचलकरंजी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये मळण लघुचित्रपटाची निवड झाली आहे.मळण च्या यशाबद्दल ॲड. चारुशील माने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.