Malan मळण gets Nomination in Mumbai Festival
Mumbai -
Malan - The Threshing मळण a short film produced, directed by Adv. Charusheel Mane, got Nomination recently. This is second film of Adv. Mane. His first successful short film - "The Brothels & Transporters" has got Best Film Award from Nashik International Film Festival now renamed as Dadasaheb Phalke Golden Camera Festival at Mumbai.
ॲड. सी. एम. माने यांच्या मळण लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चे नामांकन जाहीर
यापूर्वी मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये याच लघुपटासाठी जो लघुपट हिंगोली व जळगाव जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन ॲडव्होकेट चारुशील माने लेखन-अभिनय-दिग्दर्शन-गीतलेखन केलेला लघु चित्रपट मळण हा मुंबई येथील महोत्सवासाठी स्पर्धेत होता. तेथे देश-विदेशातील एकूण 400 पेक्षा जास्त चित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रिकव्हर ब्रदर्स आयोजित नॅशनल शर्ट सिने अवार्ड फेस्टिव्हलमध्ये तीन ऑगस्ट रोजी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देखील या लघु चित्रपटास प्राप्त झाला आहे ही आनंदाची बाब आहे
नावाजलेला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्डमध्ये मळण या लघु चित्रपटाची निवड झाली होती आणि आता सामाजिक विषयांवरील बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून नामांकन देखील जाहीर झाले आहे.
दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चित्रपट महोत्सवाचे महोत्सव दिग्दर्शक मुकेश कणेरी यांनी नुकतीच नामांकन प्राप्त लघुचित्रपटाची यादी जाहीर केली आहे.
ॲडव्होकेट माने यांचा हा दुसरा लघुचित्रपट असून यापूर्वीच्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लघु चित्रपट - दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स यास दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड हा मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता.
मळण या लघु चित्रपटात जळगाव जिल्ह्यातील कोमल सूर्यवंशी व दीपक सूर्यवंशी तसेच हिंगोली जिल्ह्यातील अशोक कऱ्हाळे, अंजली इंगोले, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, दीपक तपासे, गणेश लिंबुळे, मदन रायबोले, संचिता कर्डिले, चंद्रज्योती खंदारे, दैवशाला कर्डिले, ॲड. गजानन राठोड, ॲड. अमोल इंगळे, गजानन शिंदे, छगन बनसोडे, गणेश घ्यार, पुंजाजी गोडसे, पुंजाजी मुळे, पांडुरंग मुळे, धोंडबा लिंबुळे, प्रकाश मगरे, मारुती शिरसाट, रूपाली कावळे, राजेंद्र बोरकर, ईश्वर राऊत यांनी काम केले आहे.
लागोपाठ मिळणाऱ्या लघुचित्रपटाच्या यशाला यशामुळे निर्माता, दिग्दर्शक माने व संपूर्ण टीम तसेच सर्व कलाकार यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. असे क्लूआर्ट म्युझिक अँड मुव्हीज प्रा. ली. या निर्मिती कंपनीच्या संचालिका पूनम माने यांनी कळविले आहे.