नेक्सजन NISFF चा पुरस्कार
NEXGN INTERNATIONAL SHORT FILM FESTIVAL, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथून मळण या चित्रपटास अवॉर्ड ऑफ एक्सलन्स फॉर बेस्ट फिल्म हा पुरस्कार जिल्ह्यात दि. 14, 15 व 16 डिसेंबर या महोत्सवात दिला जाणार आहे.

About Me

Malan मळण gets Nomination in Mumbai Festival

Mumbai - Malan - The Threshing मळण a short film produced, directed by Adv. Charusheel Mane, got Nomination recently. This is second film of Adv. Mane. His first successful short film - "The Brothels & Transporters" has got Best Film Award from Nashik International Film Festival now renamed as Dadasaheb Phalke Golden Camera Festival at Mumbai.          ॲड. सी. एम. माने यांच्या मळण लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चे नामांकन जाहीर           यापूर्वी मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये याच लघुपटासाठी जो लघुपट हिंगोली व जळगाव जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन ॲडव्होकेट चारुशील माने लेखन-अभिनय-दिग्दर्शन-गीतलेखन केलेला लघु चित्रपट मळण हा मुंबई येथील महोत्सवासाठी स्पर्धेत होता. तेथे देश-विदेशातील एकूण 400 पेक्षा जास्त चित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रिकव्हर ब्रदर्स आयोजित नॅशनल शर्ट सिने अवार्ड फेस्टिव्हलमध्ये तीन ऑगस्ट रोजी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देखील या लघु चित्रपटास प्राप्त झाला आहे ही आनंदाची बाब आहे नावाजलेला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्डमध्ये मळण या लघु चित्रपटाची निवड झाली होती आणि आता सामाजिक विषयांवरील बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून नामांकन देखील जाहीर झाले आहे.             दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चित्रपट महोत्सवाचे महोत्सव दिग्दर्शक मुकेश कणेरी यांनी नुकतीच नामांकन प्राप्त लघुचित्रपटाची यादी जाहीर केली आहे.   ॲडव्होकेट माने यांचा हा दुसरा लघुचित्रपट असून यापूर्वीच्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लघु चित्रपट - दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स यास दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड हा मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता.           मळण या लघु चित्रपटात जळगाव जिल्ह्यातील कोमल सूर्यवंशी व दीपक सूर्यवंशी तसेच हिंगोली जिल्ह्यातील अशोक कऱ्हाळे, अंजली इंगोले, ज्ञानेश्वर  कऱ्हाळे, दीपक तपासे, गणेश लिंबुळे, मदन रायबोले, संचिता कर्डिले, चंद्रज्योती खंदारे, दैवशाला कर्डिले, ॲड. गजानन राठोड, ॲड. अमोल इंगळे, गजानन शिंदे, छगन बनसोडे, गणेश घ्यार, पुंजाजी गोडसे, पुंजाजी मुळे, पांडुरंग मुळे, धोंडबा लिंबुळे, प्रकाश मगरे, मारुती शिरसाट, रूपाली कावळे, राजेंद्र बोरकर, ईश्वर राऊत यांनी काम केले आहे.       लागोपाठ मिळणाऱ्या लघुचित्रपटाच्या यशाला यशामुळे निर्माता, दिग्दर्शक माने व संपूर्ण टीम तसेच सर्व कलाकार यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.  असे क्लूआर्ट म्युझिक अँड मुव्हीज प्रा. ली. या निर्मिती कंपनीच्या संचालिका पूनम माने  यांनी कळविले आहे.

मळण लघुपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार

मळण लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार ॲड. माने यांना जाहीर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन द्वारा आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक हा पुरस्कार ॲड. चारुशील माने यांच्या मळण या लघुचित्रपटाला जाहीर झाला आहे. या पूर्वी मळण लघुचित्रपटाला मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय लघुपट म्हणून नामांकन जाहीर झाले होते. जुलै महिण्यात आयोजित केलेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यात या पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात होणार आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यांच्यातील अभिनयाला वाव दिल्याने तसेच कोणत्याही कलाकाराने अभिनयाचे प्रशिक्षण न घेता त्यांच्याकडून अभिनय करून घेऊन त्यांच्या कलागुणांना संधी दिल्याबद्दल सर्वच स्तरातून ॲडव्होकेट माने यांचे स्वागत होत आहे. या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पांगरी, खरबी, बळसोंड, दाटेगाव, हिंगोली या ठिकाणी झाले होते. पांगरी येथील गावकऱ्यांनी यात मोलाचे सहकार्य केले व लघुचित्रपटात भूमिका देखील केल्या. काही कलावंत अशिक्षित होते. या लघुचित्रपटात मौजे इंचा येथील गुरुदास कामत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकत असताना संचिता कर्डीले हिने बालकलावंत म्हणून भूमिका केली आहे. रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन तर्फे गणेश रहिकवार महोत्सव दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक यांनी पुरस्कार घोषित केल्याचे कळविले आहे, या पुरस्कारात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात माने यांना देण्यात येणार आहे. पुढील व चालू लघु व मोठ्या चित्रपटात शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना अभिनयाची संधी देऊन चित्रपट सृष्टीत त्यांना आणण्याचा मानस ॲडव्होकेट माने यांनी व्यक्त केला. ॲड. माने यांनी मळणच्या सर्व टीमला यशाचे श्रेय दिले आहे. यात बहुतकरून सर्व नवीन कलाकार होते. ॲड. माने यांचे लागोपाठ त्यांच्या दोन लघुपटांना प्रत्येकी एक पुरस्कार प्राप्त झाल्याने ॲडव्होकेट माने यांचे सर्वत्र कौतुक आहे. याबाबत क्लूआर्ट म्यूझिक अँड मुव्हीज कंपनीच्या संचालिका पुनम माने यांनी कळविले आहे.

बल्लारपूर येथे पुरस्कार स्विकारताना

गायकवाड ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवार्ड फेस्टिवल मध्ये मळण लघु चित्रपट दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाल्याने सदर पुरस्काराचा स्वीकार करताना अमोल मोरे भद्रावती हे दिसत आहेत या या महोत्सवाचे आयोजक माननीय गणेश जी रहीकवार यांचे क्लू आर्ट म्यूझिक अँड मूव्हीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे खूप खूप आभार!

Amenities

Good for children
Wifi on the premises
Free consultation
Bike parking available
24/7 availability
Parking available

Testimonials

MJ
I like this...
Manohar Jamdhade
25 Jun 2019
MN
माई एक साल से कंपनी मुझे काम कर रह हू
Mayur Narwade
25 Jun 2019

Reviews

1 Reviews

Charusheel Mane (RevengerRap)

10 June 2018

10 June

2018

Audio Video production

Send a Message

An email will be sent to the owner

Opening Hours

Sunday

-

Monday

-

Tuesday

-

Wednesday

-

Thursday

-

Friday

-

Saturday

-